कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ग्रामीण रुग्णालयाचे उल्लेखनीय कार्य

 कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात ग्रामीण रुग्णालयाचे उल्लेखनीय कार्य 


औसा प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरामध्ये हाहाकार माजला होता ,अशा संकट काळामध्ये औसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना बाधित रुग्णासाठी आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करण्यात आले आहे, दिनांक 2 जून 2020 रोजी औसा तालुक्यात पहिला कोरोणा रुग्ण या  आढळला होता, तालुक्यात एकूण 1405 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले, आणि उपचारादरम्यान 22 रुग्ण दगावले,  औसा तालुका आरोग्य अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने औसा तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचार करून अशा रुग्णांना कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले, त्यानंतर ""माझे कुटुंब""  ""माझी जबाबदारी"" युवा स्वास्थ्य मिशन,हर घर दस्तक च्या  माध्यमातून घरोघरी भेटी देऊन, दररोज ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात आला यात आज पर्यंत लसीकरणा चे एकूण 33736 , डोस झाले आहेत,तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसी पासून कोणीही वंचित राहू नये म्हणून शहरातील प्रत्येक प्रभागात गल्ली निहाय कॅम्प घेऊन समाज व सामाजिक संस्था, प्रतिष्ठाने आणि मंडळांना सहभागी करून या परिसरातील नगरसेवकांचा ही सहभाग घेऊन कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली,  या उपक्रमांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर ,आर,शेख ,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंगद जाधव ,वैद्यकीय अधिकारी डॉ, सचिन रणदिवे,बि, पी,लोहार  व संपूर्ण आर, बी ,एच, के टीम स्टाफ नर्सेस  पांढरे एल व्ही, ढाकणे व्ही,एस ,कलशेट्टी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी औसा तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणे आणि कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबवून कोरोनावर मात करण्याचा उपक्रम राबविल्यामुळे या उपक्रमाचे औसा तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे,

या औसा तालुक्याची मागील 2 महिन्यापासून कोरोना मुक्तीकडे वाटचाल सूरु आहे

Post a Comment

0 Comments