प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन अर्ज स्वीकारावे:-खुंदमिर मुल्ला

 प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन अर्ज स्वीकारावे:-खुंदमिर मुल्ला


औसा प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन अर्ज स्वीकारावे, औसा शहरातील बेघर कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविणे अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी औसा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सविस्तर वृत्त औसा नगरपरिषदेच्या वतीने औसा शहरातील व परिसरातील 2018 सालीपासून आतापर्यंत तीन वेळेस प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारले असून त्या माध्यमातून औसा शहरातील व परिसरातील एकूण 667 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. औसा शहरातील अजून शिल्लक राहिलेल्या प्रधानमंत्री आवास योजने पासून वंचित लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारून त्यांचे डीपीआर शासनदरबारी मंजूर करून देण्यात यावे. व तसेच औसा शहरातील बेघर ज्यांच्या नावाने कुठल्याही प्रकारची जागा नसलेल्या गोरगरीब कुटुंबानाही प्रधानमंत्री आवास योजनेखाली घर बांधून देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून मंजूर करून घेण्यात यावे. या मागणीचे निवेदन आज दिनांक 9 नोव्हेंबर 2021  मंगळवार रोजी औसा  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना विलासराव देशमुख युवा मंचचे औसा शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनावर विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला  यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments