विठ्ठल पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्काराने सन्मानित

 विठ्ठल पांचाळ यांना राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्काराने सन्मानित


पत्रकारिता क्षेत्रातील तिसरा पुरस्कार मिळवणारे पांचाळ विठ्ठलऔसा प्रतिनिधी


मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय गुणीजन  गौरव  महापरिषद तर्फे देण्यात येणारा राज्य स्तरीयआदर्श दर्पण रत्न पुरस्कार 2021 चा पत्रकार पांचाळ विठ्ठल 5/11/2021 रोजी आनलाईन पध्दतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.पुरस्कार वितरणाचे संस्थेचे 21वर्षे असून विविध क्षेत्रातील 25 प्रतिष्ठित व्यक्तींना प्रत्येक वर्षी या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार प्रदान केला जातो . या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाला.  

महाराष्ट्र राज्यातुन विविध अशा 25 क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या या मान्यवरांच्या यादीत औसा तालुक्यातील गुळखेडा येथील पांचाळ विठ्ठल बालाजी यांची निवड झाली असून त्यांना मानाचा फेटा ,मानकरी बॅच,महावस्त्र, गौरव पदक ,सन्मानचिन्ह व मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय  आदर्श दर्पण पत्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात आले . पत्रकार पांचाळ विठ्ठल बालाजी यांना यापुर्वी उदगीर पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार, तसेच रंगकर्मी प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट शोध वार्तांकन पुरस्कार मिळाला असून आज मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरीय आदर्श दर्पण रत्न पुरस्कार असे एकूण पत्रकारिता क्षेत्रातील सलग तीन पुरस्कार मिळवणारे औसा तालुक्यातील पहिलेच पत्रकार असल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Post a Comment

0 Comments