औसा ते चाकूर अलगखाडी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361खड्डे बुजवण्याचा टेंडर घेऊन काम न करणाऱ्या डि कंन्टराक्शनवर व पी कंन्टराक्शनवर कार्यवाही करावी-जय महाराष्ट्र सेनाची मागणी


 औसा ते चाकूर अलगखाडी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361खड्डे बुजवण्याचा टेंडर घेऊन काम न करणाऱ्या डि कंन्टराक्शनवर व पी कंन्टराक्शनवर कार्यवाही करावी-जय महाराष्ट्र सेनाची मागणी

औसा प्रतिनिधी

औसा ते चाकूर अलगखाडी राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी ते नागपूर महामार्ग क्रमांक 361खड्डे बुजवण्याचा टेंडर घेऊन काम न करणाऱ्या डि कंन्टराक्शनवर व पी कंन्टराक्शनवर कार्यवाही करावी अशी मागणी जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांनी दि.25 नोव्हेंबर 2021गुरुवार रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री दिल्ली नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या निवेदनात सविस्तर वृत्त असे राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी ते नागपूर महामार्ग क्रमांक 361 चे सिमेंट रस्ता गंगामाई कंन्टराक्शन कंपनी औरंगाबाद ला सिमेंट रस्ता करण्याचा काम घेतलेला आहे.पण त्याचा रोडचे खड्डे व साईड रस्त्याचे 12 कोटीचे काम डि. कंन्टराक्शनला दिलेले आहे.तरी या दोघांनी आजपर्यंत एकही खड्डा बुजवलेला नाही,किंवा साईड रस्ता व डांबरीकरण केलेला नाही.तरी या दोन्ही कंन्टराक्शन कंपनीवर कार्यवाही करुन त्यांना बिल देऊ नये या खड्यामुळे आजपर्यंत औस-लातुर रोडवर मेलेले 10 लोकांचे मनुष्यवधान गुन्हा दाखल करावा.व त्या कंन्टराक्शन कंपनीचे नाव काळया यादीमध्ये टाकावे.आशी मागणी जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले आहे.या निवेदनावर जय महाराष्ट्र सेनाचे अध्यक्ष जे.पी.औसेकर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments