औसा शहरातील न.प. च्या वतीने 3 रा डी.पी. आर मध्ये मंजूर असलेले प्रधानमंत्री आवास योजनेखाली 421 लाभार्थ्यांना त्वरीत पहिल्या हाप्त्याची निधी द्या:-काॅग्रेस ओबीसी विभागची मागणी

 औसा शहरातील न.प. च्या वतीने 3 रा डी.पी. आर मध्ये मंजूर असलेले प्रधानमंत्री आवास योजनेखाली 421 लाभार्थ्यांना त्वरीत पहिल्या हाप्त्याची निधी द्या:-काॅग्रेस ओबीसी विभागची मागणी


औसा प्रतिनिधी

औसा शहरातील नगर परिषदेच्या वतीने 3रा डी. पी.आर . मध्ये मंजूर असलेले प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 421 लाभार्थ्यांना त्वरित पहिल्या हप्त्याची निधी द्या, प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थ्यांकडुन बांधकाम परवाण्यांचे शुल्क माफ करा अशी मागणी काॅग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने औसा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.या मागणीचे सविस्तर वृत्त असे

औसा नगर परिषदच्या वतीने 3 रा डी.पी.आर. मध्ये मंजूर झालेल्या 421 लाभार्थ्यांचे निधी औसा नगर पालीकेला शासनाकडून मागील एक ते दीड महिन्यापुर्वीच प्राप्त झाले असून न.प. च्या वतीने या 421लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचा पहिला हाप्ता जमा करण्यात आलेला नाही. आज दिवसेन दिवस बांधकाम साहित्याचे दरामध्ये वाढ होत आहे. व आपल्याकडून शासनाकडून निधी आला असतानासुध्दा आपण लाभार्थ्यांना निधी देण्यास टाळाटाळ करीत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे.


हे की, सदरील गोरगरीब लाभार्थ्यांना न.प. च्या वतीने बांधकाम परवाण्यासाठी फिस शुल्क ची मागणी होत आहे. शासनाच्या सुचनेनूसार या योजनेतील लाभार्थ्याकडून त्यांच्या 3 या हाप्त्यामधून बांधकाम परवाण्याचे शुल्क वजा करून घेण्यात यावे असे पत्र शासनाने दिलेले आहे. किंवा सदरील गोरगरीब लाभार्थ्याकडून बांधकाम परवाण्यासाठी शुल्क आकारण्यात येऊ नये अशी आमची विनंती आहे.

आमच्या वरील मागण्या प्रमाणे येत्या मंगळवार पर्यंत लाभार्थ्याच्या खात्यात घरकुलचे निधी जमा न झाल्यास येणाऱ्या बुधवारी न.प. समोर लोकशाहीपध्दतीने बोंबाबोंब आंदोलन करण्याचे ठरविले आहे.असा इशारा काॅग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने दिला आहे.यावेळी काॅग्रेस ओबीसी विभागाचे औसा शहराध्यक्ष भागवत पांडुरंग म्हेत्रे, इस्माईल,( हाजी)शेख अल्पसंख्याक काॅग्रेसचे शहराध्यक्ष, गणेश कसबे अनुसूचित जमाती शहराध्यक्ष काॅग्रेस,खुंदमिर मुल्ला विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष औसा,नियामत लोहारे ओबीसी काॅग्रेस शहर कार्याध्यक्ष औसा आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments