मुस्लिम समाजातील विविध समस्यांच्या निराकरण साठी सदैव तयार... आ.अभिमन्यू पवार


 

मुस्लिम समाजातील विविध समस्यांच्या निराकरण साठी सदैव तयार... आ.अभिमन्यू पवार

Ausa. शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचे विविध अंगी समाज जीवनमान उंचावण्या साठी मी सदैव तत्पर आहे.शासनाच्या विविध योजनांचा फायदा मुस्लिम समाजातील सर्व घटका पर्यंत पोचवून त्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन करून आ.अभिमन्यू पवार यांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.ते Ausa येथे मुस्लिम समाजाच्या समस्या वर आधारित एका बैठकीत बोलत होते. श्री मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालय येथे आ.अभिमन्यू पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत शहरातील व तालुक्यातील निमंत्रित मुस्लिम सामाजिक ,शैक्षणिक, व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अध्यक्षस्थानी निलंगा न.प चे माजी नगराध्यक्ष हमीद भाई शेख व प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार म.मुस्लिम कबीर, लातूर चे माजी नगर सेवक मोहसीन शेख, डा.रहिमुद्दिन शेख, अड.गफुरुल्ला हाश्मी उपस्थित होते, संचालन माजी उप नगराध्यक्ष फहीम शेख यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात पत्रकार म.मुस्लिम कबीर यांनी मुस्लिम समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक समस्या मांडून शासनाच्या 15 कलमी कार्यक्रम राबविण्यात कोणतेच सरकार गंभीर नाही असे नमूद करून आ. पवार यांनी या कडे गांभीर्याने लक्ष घालावे असे आवाहन केले. 

 बजमे उर्दू अदब चे अवेस सिद्दीकी यांनी समाजातील युवकांना शैक्षणिक प्रवाहात आण्ण्या साठी स्टडी सर्कल स्थापन करण्याची सूचना केली. सामाजिक कार्यकर्ते अड.फेरोज खान पठाण यांनी शिक्षणात वैचारिक व तंत्रज्ञानाची जोड देवुन सुसंस्कृत समाज निर्मिती साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे व या करिता शासनाच्या विविध योजनांचा फायदा कसा देता येईल हे आमदार साहेबांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. डा. रहिमुद्दीन शेख यांनी आरोग्य विषयक समस्या मांडून स्त्री रुग्णालय निर्मिती ची मागणी केली. मुस्लिम समाजातील समस्यांना ऐपतदार लोक ही जबाबदार असल्याचे मत मांडून मुस्लिम संस्था चालकांनी पॅरा मेडिकल कॉलेज स्थापन करावे व आ.पवार यांनी या साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. मुजफ्फर इनामदार यांनी शहर व परिसरातील समस्या मांडल्या. अड.गाफुरुल्ला हाश्मी यांनी नवीन हद्दवाड भागातील व मेन रोड चे तिसरे टप्पे चे काम सुरू करण्याची मागणी केली. मुझाम्मिल शेख यांनी चांगल्या प्रतीच्या शिक्षणा साठी व बँकांतील मुस्लिम समाजाची पत वाढविण्या साठी आ.पवार यांनी प्रयत्न करावे असे सांगितले. पत्रकार जलील पठाण यांनी समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्ासाठी आ.पवार यांनी प्रयत्न करावे व या समाजाच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन केले. अर्शद कुरेशी, मिन्हाज पटेल, वारीस शेख, सज्जाद सर्गुरु आदी नी आपले विचार मांडले.Post a Comment

0 Comments