बेलकुंड जि.प.प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


 

*बेलकुंड जि.प.प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार :* 


औसा तालुक्यातील बेलकुंड येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सन् 2020 च्या राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याबद्दल इयत्ता दुसरी व तिसरीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व 200 रु चा धनादेश व गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचा सत्कार गावचे सरपंच विष्णु कोळी यांच्या शुभहस्ते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद वगरे उपाध्यक्ष विलास तपासे व पोलीस पाटील व्यंकटराव साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील हे होते. 


राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परिक्षेत इयत्ता दुसरीतील विद्यार्थीनी कु. अनुष्का नितीन साळुंके हिने राज्यात 10 वा. तर आदीती बालाजी कांबळे व स्नेहा महादेव करसुळे यांनी राज्यात 16 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता तिसरीतील कु सृष्टी विष्णु कोळी या विद्यार्थीनीने राज्यात 16 वा क्रमांक पटकावला आहे. दुसरीतील गुणवंत विद्यार्थ्यांना श्रीमती शशिकला गवलवाड यांचे तर 

तिसरीतील गुणवंतांना श्रीमती महादेवी वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गणेश दिक्षित , अब्दुल शेख, संजय विभूते, मधूकर गोरे, संजीव बिराजदार, मनोज बनकर, मोहन कांबळे श्रीमती जयश्री पांडे, श्रीमती सीमा कुलकर्णी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गोविंद शिंदे तर आभार दत्तात्रय दंडगुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments