जिल्हा लोक आदालत पॅनलचे न्या.रमेश उमरगे यांचा चंद्रशेखर महाराज यांच्या वतीने सत्कार


 

जिल्हा लोक आदालत पॅनलचे न्या.रमेश उमरगे यांचा चंद्रशेखर महाराज यांच्या वतीने सत्कार 

औसा (प्रतिनिधी)दि.12

 पुणे जिल्हा लोक अदालत कोर्टाच्या पॅनलचे न्यायमूर्ती रमेश उमरगे यांची त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन हिरेमठ संस्थांचे शिवभक्त परायण चंद्रशेखर महाराज यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला. न्या. रमेश उमरगे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि ते समाज कार्यात अग्रेसर असल्यामुळे ते या सत्काराचे मानकरी ठरले. पुणे लोक आदालत पॅनलचे न्या. रमेश उमरगे यांचे कार्य समाजोपयोगी असून औसा येथील हिरेमठ संस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करून भावी कार्यासाठी श्री चंद्रशेखर हिरेमठ महाराज यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments