विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त
औसा प्रतिनिधी
आझादी का अमृत महोत्सव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने औसा पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी मा.सूर्यकांत भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती औसा येथे साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औसा पंचायत समीतीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मा.पाटील साहेब होते.प्रमुख पाहुणे म्हणून औसा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा.प्राची कुलकर्णी मॅडम, तहसीलदार मा.भरत सुर्यवंशी साहेब, औसा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड श्रीधर जाधव, औसा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घोरपडे, किल्लारी पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक गायकवाड,भादा पोलिस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक नवले , औसा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग प्रमुख महेमुद शेख , वकील मंडळाचे सर्व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस, पंचायत समीतीचे कर्मचारी , नागरिक, पत्रकार, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments