औसा शहरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची युवा भिम सेनेची मुख्यधिकारी यांचेकडे मागणी
बी डी उबाळे
औसा-औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी असून गेल्या अनेक वर्षापासून औसा तालुक्यातील भीमसैनिकांची ही मागणी औशामध्ये पुतळा असावा अशी असून या बाबीकडे लक्ष देण्यासाठी औसा नगर परिषदेस दि 18 ऑक्टोबर 2021 रोजी निवेदन देण्यात आले आहे.
औसा तालुक्यामध्ये दरवर्षी 14 एप्रिल रोजी भव्य- दिव्य अशी भीम जयंती जल्लोष केला जातो, यामुळे भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी औश्यामध्ये पुतळा नसल्याने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा लागतो.यामुळे भीमसैनिकांचा उत्साहावर विरजण पडते.
यामुळे जर औशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा निर्माण झाला तर औसा तालुक्यातील भीमसैनिकांना मोठा अभिमान वाटेल आणि भीमसैनिक आणखीही जोमाने भीम जयंती साजरी करतील.याकरिता औसा तालुक्यातील युवा भिम सेनेचे कार्यकर्ते आणि भीमसैनिक एकत्रित येऊन नगर परिषद औसा निवेदन देण्यात आले आहे.
याकरिता औसा नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी औसा शहरातील मुख्य रस्त्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावा आणि त्याचा जागेचा 8 अ तयार करून नियोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा असा फलक लावावा अशी मागणी युवा भिम सेना अध्यक्ष पंकज काटे आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावेळी औसा तालुक्यातील युवा भिम सैनिक समाधान शितोळे, शेखर कांबळे, प्रकाश जबडे, महेबूब सय्यद, कुमार कांबळे,शुभम बनसोडे,विष्णू तांदळे, सिद्धार्थ गवळी, सुनील म्हस्के, अनिल जोगदंड, महादेव भांगे, अमित सोनवणे, तात्या कांबळे,आनंद कांबळे,राजपाल शिंदे आदी युवा भिम सेना कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments