अनुषंगिक लाभ व रजा रोखीकरण याची रक्कम थकल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दुरावस्था


 

अनुषंगिक लाभ व रजा रोखीकरण याची रक्कम थकल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दुरावस्था 

औसा प्रतिनिधी

नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन अनुषंगिक लाभ व रजा रोखीकरण ची रक्कम मागील अनेक दिवसापासून थकल्यामुळे नगरपरिषद येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असून यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नगरपालिके विषयी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की औसा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आत्माराम हरिबा बनसोडे हे दिनांक 30 एप्रिल 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानंतर नगर परिषद कार्यालयामार्फत रजा रोखीकरण व निवृत्तिवेतन त्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत त्यांना कौटुंबिक जिल्हा न्यायालय लातूर येथे 2 लाख रुपये रक्कम भरणे आहे. तसेच त्यांच्याकडे खाजगी कर्ज असून मुलीचे लग्न पैशाअभावी थांबले आहे. तसेच घराचे बांधकाम सुद्धा थांबल्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी आत्माराम हरिबा बनसोडे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे दिनांक 22 सप्टेंबर 2021 रोजी अर्जाद्वारे विनंती केली असून आपणास रजा रोखीकरण व अनुषंगिक लाल लाभाची रक्कम उपदान रक्कम त्वरित द्यावी अन्यथा ही रक्कम देण्यास विलंब झाल्यास माझे काही बरेवाईट झाले तर नगर परिषद कार्यालय जबाबदार राहील अशी असा इशारा आत्माराम बनसोडे यांनी आपल्या निवेदनातून दिला आहे. कौटुंबिक न्यायालय मध्ये 2 लाख रुपये भरण्यासाठी द्यावे. अशा मागणीचा अर्ज मुख्याधिकारी यांच्याकडे दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी देण्यासाठी गेले असता मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला नसल्याचे आत्माराम बनसोडे यांनी सांगितले. नगरपालिकेकडे थकीत असलेल्या एकूण 6 लाख 33 हजार यापैकी किमान 2 लाख रुपये मला त्वरित द्यावे. अशी मागणी आत्माराम बनसोडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments