हिरेमठ संस्थानचे अध्वर्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रांगोळी प्रतिमा


 

हिरेमठ संस्थानचे अध्वर्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रांगोळी प्रतिमा 

औसा (प्रतिनिधी) 

औसा येथील हिरेमठ संस्थांनचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिरेमठ संस्थान मध्ये त्यांच्या पावन समाधीस महाअभिषेक करण्यात आला.

 तसेच सामूहिक उद्यापण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.शिराढोण ता. कळंब येथील कलाकार राजकुमार कुंभार यांनी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची रांगोळीच्या माध्यमातून भव्य प्रतिमा काढून भक्तगणांचे लक्ष वेधले. या वेळी संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतवीर लिंग शिवाचार्य महाराज, पीठाधीपती ष. ब्र. 108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज, श्री चंद्रशेखर हिरेमठ महाराज यांनी या कार्यक्रमात भाविकांना आशीर्वाद दिले. तसेच या कार्यक्रमानिमित्त हिरेमठ संस्थांनच्या शेकडो शिष्यगणांनी कोरोना नियमाचे पालन करून गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पावन समाधीचे दर्शन घेतले.

Post a Comment

0 Comments