नेत्रतपासणी व कोरोना लसीकरण औशात उस्फूर्त प्रतिसाद


 

नेत्रतपासणी व कोरोना लसीकरण औशात उस्फूर्त प्रतिसाद

 औसा प्रतिनिधी

  ग्रामीण रुग्णालय औसा आणि पप्पू भाऊ डांगे छाया स्मृति बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पप्पू भाऊ डांगे यांच्या स्मरणार्थ नेत्र तपासणी शिबिर आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी भीम नगर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित नेत्रतपासणी शिबिर व

कोरोना लसीकरण नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या शिबिरास औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनीही भेट दिली .या शिबिरामध्ये एकूण 250 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 25 रुग्णांची ऑपरेशन साठी निवड करण्यात आली असून शंभर नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अंगद जाधव डॉक्टर केंद्रे विकास पाटील डॉ सोनटक्के आणि शिबिराच्या संयोजक तथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पनाताई डांगे यांनी शिबिराचे उत्कृष्ट आयोजन केले होते याप्रसंगी समाजबांधव व संस्थेचे पदाधिकारी यांनी शिबीर यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments