आम आदमी पार्टीच्या औसा तालुकाध्यक्ष पदी अॅड अनिल मोरे यांची निवड


 

आम आदमी पार्टीच्या औसा तालुकाध्यक्ष पदी अॅड अनिल मोरे यांची निवड

औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील याकतपूर येथील अॅड अनिल शिवाजीराव मोरे यांची आम आदमी पार्टीच्या वतीने 7 संप्टेबर 2021 गुरुवार रोजी लातुर येथे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या हस्ते औसा तालुकाध्यक्ष पदी निवड करुन त्यांचा सत्कार केला.व त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून आपण पक्षाची विचारधारा, कार्यप्रणाली अंगीकृत केल्याबद्दल व पुढील सामाजिक, राजकीय कार्याबद्दल आपणास पक्षातर्फे मन: पूर्वक शुभेछ्या दिल्या.यावेळी निवड प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले,औसा शहराध्यक्ष अहेमद शेख आदि उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारामध्ये अभिनंदन होत आहे.Post a Comment

0 Comments