*मातोळा येथे वन्यजीव सप्ताह साजरा*
औसा प्रतिनिधी:-
संपूर्ण देश भरात 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीवांचे मानवी आयुष्यातील महत्व व वन्यजीवांची सद्या स्थितीतील परिस्थिती विषयी जनजागृती करून वन्यजीवांचे संरक्षण करण्याकरिता वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधत औसा तालुक्यातील मातोळा या ठिकाणी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी लातूर वनविभाग औसा परिक्षेत्र व माधवराव भोसले माध्यमिक विद्यालय मातोळा यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले , प्रमुख पाहुणे म्हणून औसा वनमंडळ परिक्षेत्र अधिकारी गणेश शेवाळे , औसा वनाधिकारी गोविंद घुले , लामजना वनाधिकारी पांडुरंग चिल्ले , भादा बिटचे वनरक्षक माधव मुंडे त्याचप्रमाणे वनसेवक दगडू ठणके, सीताराम शिंदे, वन्यजीवरक्षक सचिन क्षीरसागर , आदित्य भोसले, अजय पुतवाड, सुरज ठाकूर हे उपस्थित होते.
आजच्या काळात पर्यावरणाचे संवर्धन करायचे असल्यास वन्यजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, कारण वन्यप्राणी हे पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. वन्यजीवांचे रक्षण करणे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनमंडळ परिक्षेत्र अधिकारी गणेश शेवाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधवराव भोसले महाविद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी यांनी सहकार्य केले.
0 Comments