ग्रामीण भागातील बस सेवेसाठी अभाविपचे निवेदन
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील ग्रामीण भागात काही मार्गावरील बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सुरू असलेल्या बस पूर्ववत चालू कराव्या अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आगारप्रमुख औसा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लातूर ते निलंगा बससाठी करजगाव पाटील थांबा देण्यात यावा तसेच किनिथोट मार्गे पानचिंचोली बस पूर्ववत सुरू करावी आणि भादा गावासाठी स्वतंत्र बस सुरु करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बसेस बंद असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांची गैरसोय होत असून सध्या दिपवाळीच्या सणाचा उत्सव सुरू होत असताना ग्रामीण भागात बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यासाठी या बसेस पूर्ववत चालू कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून या निवेदनावर संघटनेचे प्रणव नागराळे, आकाश डाळिंबे, विक्रम साळुंके, कृष्णा दळवे, बिबीशन भुजबळ, गणेश पाटील, शुभम चांदोरे, बालाजी अजने, सागर मगर, दत्ता घोरपडे, ओमकार पाटील यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 Comments