भादा पोलिसांचा सम्राट युवा सामाजिक संघटनेकडून सत्कार


 

भादा पोलिसांचा
सम्राट युवा सामाजिक संघटनेकडून सत्कार

औसा प्रतिनिधी

बेलकुंड येथे ग्रामपंचायत कार्यालयात भादा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांचा सत्कार करण्यात आला.

अवघ्या एक महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धाडसी कारवाई केल्यामुळे कधी दारूवर तर कधी डावावर धाडी टाकून अनेक गावांत दारू बंद डाव बंद अशे अनेक अवैध धंदे बंद केले आहेत. तसेच गावामध्ये भुरट्या चोराने थैमान घातले आहे, रोज बेलकुंड व परिसरामधे रात्री दोन ते तीन च्या सुमारास पोलीस गाडी येऊन गस्त घालून जाते. त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी झाले आहे. याबद्दल सम्राट युवा सामाजिक संघटनेच्या वतीने बेलकुंड येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष सोमनाथ कांबळे,उपसरपंच सचिन पवार, वाईस चेअरमन संतोष हलकरे, युवा कार्यकर्ते अन्वर शेख, अमोल जाधव, बाबा कांबळे, अखिल शेख, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महम्मद पठाण, रतन कांबळे, महेश कांबळे, शरद कांबळे, विश्वजीत कांबळे, शरद पवार, मंगेश कणकधर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.Post a Comment

0 Comments