ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान


 

ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान

 औसा प्रतिनिधी

 ज्येष्ठ नागरिक संघ औसा आणि नगर परिषद औसा यांच्या संयुक्त विद्यमाने 1 आक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करीत असताना संघाच्यावतीने ज्येष्ठ नागरिकाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी नागप्पा हवाप्पा सगरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मंगल बाई सगरे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरे सेवानिवृत्त उपप्राचार्य जी एस औटी,बडगिरे सुरेश, स्वामी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश आप्पा ठेसे,ज्ञानोबा काळे, कल्याणी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते,

 ज्येष्ठ नागरिक संघाने घरी येऊन ज्येष्ठा चा सन्मान केल्याबद्दल काशिनाथ सगरे अजय सगरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचा धन्यवाद दिले.

Post a Comment

0 Comments