अन्नदात्यासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलनास सुरुवात


 

अन्नदात्यासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलनास सुरुवात


शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतकरी पुत्र, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, युवक या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहे. लातूर मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही. 


या आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार मा.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर, आ.रमेशआप्पा कराड शिवाजीराव पाटील कव्हेकर, विनायकराव पाटील, अरविंद पाटील निलंगेकर, दिलीपराव देशमुख, राहुल केंद्रे, गुरुनाथ मगे,पंडित सुर्यवंशी, संजय दोरवे, रामचंद्र तिरूके,संजय हलगरकर नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments