नागलगाव येथील मृत्यू युवक अविनाश शेरे याच्या कुटुंबाला राज्यसरकार ने तात्काळ मदत द्यावी व घटनेची सखोल चौकशी करा ,माजी आमदार सुधाकर भालेराव.........
नागलगाव येथिल युवक अविनाश शेरे यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू की षडयंत्र करून हत्या केली आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे ? .त्यांचा नळगीर ता उदगीर या शिवारात मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी
व त्या कुटुंबाला तात्काळ 50 लाख रुपये मदत तात्काळ द्यावी .....उदगीर चे राज्य मंत्री हे पीडित कुटुंबातील सदस्यांची सांत्वन भेट कधी घेतील ?
आज विद्युत खात्यातील काम हे इंजिनिअर ने बारकाईने लक्ष देऊन केलं पाहिजे,कुठलीही पाहणी तांत्रिक बाबी लक्षात न घेता तरुणांना विजेच्या खांबावर चढवतात,तरुण युवकांना त्या ठिकाणी आपला जीव गमवावा लागतो ,लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील जीमेदार कार्यकारी अभियंता इंजिनिअर
संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे पण यामध्ये खऱ्या अर्थाने हत्या खुनाचा गुन्हा दाखल होणे अत्यावश्यक आहे
आशा निष्काळजी पणाने हे तीन पक्षाचे सरकार आपले काम करत आहेत ,उदगीरच्या राज्यमंत्र्यानी ह्या घटनेवर बारकाईने लक्ष देऊन सखोल चौकशी करावी .....अन्यथा आम्ही गप्प बसणार नाहीअसा इशारा देण्यात आला आज दि 5 ऑक्टोबर 2021 रोजी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुधाकर भालेराव ( माजी आमदार ) यांनी पीडित कुटुंबातील सर्व सदस्यांची सांत्वन भेट घेऊन त्या परिवारांना न्याय मिळवून दिल्या शिवाय गप्प बसणार अशी गवाही दिली या सर्व घटनेची पूर्ण माहिती माजी मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना सांगून कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
या वेळी गावातील सदस्य व सर्व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments