गांधी जयंती निमित्त खादीच्या खरेदीवर 20 टक्के सूट


 

गांधी जयंती निमित्त खादीच्या खरेदीवर 20 टक्के सूट 

ॲसा (प्रतिनिधी)दि.6

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दि. 2 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने खादी वस्तूंच्या खरेदीवर 20 टक्के सूट देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.सुती खादी संस्था व पर प्रांत, रेशम स्पन फिल्ड, पॉली वस्त्र संस्था व परप्रांत, उलन (कबल रग) इत्यादी या सर्व खादी वस्तूंच्या खरेदीवर 20 टक्के सूट देण्याचा निर्णय मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्यावतीने घेण्यात आला असून खादी प्रेमी ग्राहकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त देण्यात येणार्‍या 20 टक्के रिबेट सुटीचा लाभ घ्यावा असे आवाहन सचिव तथा माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments