किल्लारी येथे स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा कर्ज मेळावा
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती औसा व बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा किल्लारी यांच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा कर्ज मेळावा दि.25 संप्टेबर 2021 शनिवार रोजी घेण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी किल्लारी गावचे सरपंच व बॅंकेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद सुर्यवंशी,उमेदचे तालुका व्यवस्थापक किशोर आकुडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी स्वयंसहाय्यता महिलांच्या 15 गटांना बॅंकेचे 15 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले.हा कार्यक्रम महिला केंद्र येथे घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये 15बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयश्री कांबळे यांनी केले.
0 Comments