वीज बिल थकबाकी मध्ये वीज ग्राहकांना हप्ते पाडून द्या,व जे थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम थांबवा:खुंदमीर मुल्ला
औसा प्रतिनिधी
आपल्या कार्यालय मार्फत औसा शहरात व परिसरात वीज थकबाकी दारांचे बाकी न भरल्यामुळे विज कनेक्शन तोडण्याची मोहीम चालू असल्याचे समजते हे की सध्या मागील पंधरा दिवसांपासून अतिवृष्टी व मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनमुळे गोरगरीब मोलमजुरी करून खाणारे लोक आर्थिक अडचणी मध्ये सापडले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे महावितरणचे विज बिल थकबाकी राहीली आहे.सध्या नागरिकांना हे विज बिल थकबाकी भरतांना त्यांना 5 हजारांच्या वर रकमेवर हप्ते पाडून द्यावे.व तसेच विज बिल थकबाकी दारांचे सध्या विज कट करु नये कारण सध्या शहरात व परिसरात डेंगू सारखे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे.विज कनेक्शन कट केल्यावर घरातील पंखे लाईट बंद पडल्यावर नागरिकांना डासांचा त्रास होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तरी मा उपकार्यकारी अभियंता उपविभाग औसा यांना वरील सर्व बाबींचा विचार करून थकबाकीदारांना हप्ते पाडून द्यावे व विज बिल भरण्यास सहकार्य करावे अशी मागणी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी दि. 28 संप्टेबर रोजी निवेदन मा उपकार्यकारी अभियंता व उपविभाग औसा यांना सादर केले आहे.
0 Comments