भादा रोडवरील काटेरी झुडपे काढून पाण्याचा प्रवाह मोकळा केला
औसा प्रतिनिधी
औसा शहरापासून भादा मुरुड जाणाऱ्या रस्त्यावर बौद्ध नगर येथील पुलापासून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली होती .तसेच भादा विषयीच्या बाजूला बे श्रमाची झाडे व काटेरी झुडपे वाढल्याने पाण्याचा प्रवाह थांबत होता. पाण्यामध्ये नालीतील वाहून आलेल्या प्लास्टिक बॅगा व कचरा अडकल्याने भादा रोडवरील पुलावरून वाहतूक ठप्प होती. मागील दोन दिवसापासून अतिवृष्टी सुरू असल्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबल्याने अनेक शेतकरी शेतावरून येत असताना पुलाच्या पलीकडे खोळंबले होते त्यामुळे औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अफसर शेख व मुख्याधिकारी वसुधा फड यांना माजी उपनगराध्यक्ष दिगंबर माळी यांनी विनंती करून भादा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडपे आणि बेशरमाचे झाडे काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी अनुकूलता दर्शवून जेसीबी मशिनच्या साह्याने दिगंबर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली काटेरी झुडपे काढण्यात आली आहेत. त्यामुळे गावाच्या लगतच्या ओढ्यातून पाण्याचा विसर्ग व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. याकामी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी तातडीने दखल घेतल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी नगरपालिकेस धन्यवाद दिले आहेत.
0 Comments