अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी


 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची सूचना देण्यासाठी शेतकऱ्यांची तोबा गर्दी !

औसा (प्रतिनिधी) औसा तालुक्यामध्ये दिनांक ४ व ५ सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना ७२ तासांमध्ये आपल्या शेतातील नुकसानीची सूचना देण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्या अनुषंगाने गणेश चतुर्थीच्या दिवशी दिनांक १० सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयामध्ये तोबा गर्दी केली होती. शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज,सातबारा,आठ अ, बँक पासबुकची प्रत, आधार कार्ड आणि पीक विमा भरलेल्या पावतीची प्रत जोडून अर्ज देण्यासाठी एकच गर्दी केली होती. गणेश चतुर्थीचा दिवस असतानासुद्धा शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी तालुका कृषि कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.


Post a Comment

0 Comments