तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आकाश पाटील यांची निवड


 

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आकाश पाटील यांची निवड !


औसा (प्रतिनिधी)औसा तालुक्यातील एरंडी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते येथील युवा कार्यकर्ते आकाश प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. आकाश पाटील हे मराठा ठोक क्रांती मोर्चा आणि शिव सेवक समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन आता त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल गावातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य, चेअरमन ग्रामसेवक व ग्रामस्थांनी स्वागत करून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आकाश पाटील यांच्या हातून गावातील तक्रारी गावातच मिटविण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments