विना पंचनामा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा. डॉ. राजन माकणीकर


 

*विना पंचनामा सरसकट शेतकऱ्यांना मदत करा. डॉ. राजन माकणीकर*


*मुंबई दि (प्रतिनिधी) विना पंचनामा सरसकट सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल द्वारे केली आहे.*


लातुरात सतत ७२ तास अतिवृष्टी झाल्याने मांजरा व अन्य नद्या ओतंबून वाहत असून पुरसदृष्य स्थिती झालींय, जीवनमान अस्तव्यस्त होऊन होत्याचे नाहीसे झाले आहे, शेतकरी पुरता बुडाला असून त्याची शेती सर्व पाण्याखाली गेल्याने हाती काही उरेल अस वाटत नाही, त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत पुरवावी तसेच अन्य नागरिकांना संसारोपयोगी सुविधा व आर्थिक आधार द्यावा. 


मराठवाड्यातील लातूर जिल्हा अत्यंत मागासलेला असून हरेक वर्षी येथे दुष्काळाचे सावट असते, शैक्षणिक पंढरी असलेल्या या जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ सातत्याने असतो फक्त शासनातर्फे कधी कधी दुष्काळ जाहीर केला नाही.


अश्या परिस्थितीत लातूर जिल्हा नेहमी जीवन जगत असतो, उन्हाळ्यात तर १५ ते कधी कधी ३० दिवसाला एकदा येथे पाणी सुटते यामुळे या जिल्ह्याला विशेष अशी समिती नेमावी व ओला आणि कोरडा दुष्काळ नियंत्रनात आणावा. जेणेकरून जीवनमान सुलभ आरोग्यदायी ठरेल.


पूरग्रस्त भागात नागरिकांना अडी अडचणी व समस्या निर्माण झाल्या असतील किंवा कोणती मदत त्यांच्यापर्यंत पोहोंचली नसेल तर अश्यांनी घाबरून न जाता ९००४५४५०४५ या व्हाट्सअप्प क्रमांकावर संदेश व लोकेशन पाठवावे लवकरात लवकर रिपाई डेमोक्रॅटिक चे पंथर्स मदतीला येतील असेही दिलासादायक आश्वासन डॉ. माकणीकर यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments