नागरसोगा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
17 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय नागरसोगा येथे 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच सौ. सरोजा भास्कर सूर्यवंशी ह्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला व तसेच मुक्ती संग्राम चळवळीतील महान पुरुष स्वामी रामानंद तीर्थ, देविसिग चौहान गुरुजी, सरदार वल्लभाई पटेल, स्वतंत्र सेनानी चंद्रशेखर बाजपाई ह्या पुरुषांना फोटोला हार घालून मानवंदना देण्यात आली देशाला इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून मराठवाडा बराच काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच मराठवाड्याचा हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
निजामाच्या अन्यायी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व केले ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी. रझाकारांचे जनतेवर अत्याचार करणे सुरुच होते. मात्र देवीसिंग चौहान गुरुजी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा लढा खेड्यापाड्यात पोहचला. 7 सप्टेंबरला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैद्राबाद संस्थानवर पोलिस बळाचा वापर करण्याचे आदेश दिला. त्यानुसार १३ सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरु करण्यात आले. या दरम्यान १७ सप्टेंबरला निजामाने माघार घेतली. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो दिवस 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो.
0 Comments