तपसेचिंचोली विभागाअंतर्गत चलबुर्गा येथे पोषण महाअभियान कार्यक्रमाचा समारोप


 

*तपसेचिंचोली विभागाअंतर्गत चलबुर्गा येथे पोषण महाअभियान कार्यक्रमाचा समारोप*


औसा :- दि 30-9-2021 रोजी किल्लारी प्रकल्पातील तपसे चिंचोली विभागाअंतर्गत येणाऱ्या चलबुर्गा या ठिकाणी पोषणमहा अभियानाचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला गावचे उपसरपंच मोरे दगडू तुळशीराम, ग्रा पं सदस्य सौ मोरे स्वाती परमेश्वर, पुरुष नागरिक पाटील पांडुरंग उमाकांत, गरोदर , स्तनदा माता, इतर महिला व किशोरी मुली, अंगणवाड्या सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.


सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर गौरवी गणपती परिहार या 6 महिने पूर्ण झालेल्या बालकाचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करुन आहार खाऊ घालण्यात आले मातेला वरचा आहार चालू करण्यासाठी सांगितले.

यावेळी तपसे चिंचोली विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती भोसले मॅडम यांनी आहार,आरोग्य,व बालकाची वाढ व विकास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अं सेविका कांबळे मुक्ताबाई शिवराज, लिंबाळकर दैवशाला व्यंकट, सुरवसे कमल अशोक, अंगणवाडी मदतनीस चव्हाण मंजुशा भिमाशंकर, टोंपे शोभा बब्रुवान, सातपुते पार्वती शिवाजी, यांनी सहकार्य केले.Post a Comment

0 Comments