औसा शहरातील समस्यांची पाहणी करण्यासाठी वेळ द्या: एम आय एम पक्षाची मागणी


 

औसा शहरातील समस्यांची पाहणी करण्यासाठी वेळ द्या: एम आय एम पक्षाची मागणी

औसा प्रतिनिधी

औसा शहरात ब-याच ठिकाणी रस्ते,नाल्या,घाणीचे साम्राज्य व इतर अपूर्ण असलेल्या सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी वेळ द्यावा अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज दि.15 संप्टेबर 2021 बुधवार रोजी निवेदन सादर केले आहे.या निवेदनात सविस्तर वृत्त असे औसा शहरातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येते की औसा शहरात ब-याच ठिकाणी रस्ते, नाल्या घाणीचे साम्राज्य व इतर अपूर्ण असलेल्या सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी आपला वेळ द्यावा जेणेकरून शहरातील नागरिकांना मुलभूत गरजा पुरवण्यात येतील शहरात अनेक ठिकाणी रखडलेली विकास कामे घाणीचे साम्राज्य पसरून डेंगु, मलेरिया यासारखे आजारांपासून नागरिक त्रस्त आहेत.तसेच शहरातील मुख्य रस्ता व गल्ली बोळातील अडचणी निदर्शनास आणून द्यावयचे आहेत. तरी सदरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपला अमुल्य वेळ देऊन एम आय एम ची मागणी पूर्ण करण्यात यावी.या मागणीचे निवेदन एम आय एम पक्षाचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments