उदगीर समाजवादी पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी आणि नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले


 

*उदगीर समाजवादी पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी आणि नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले.* 

(उदगीर प्रतिनिधी) :- उदगीर

शहरां मध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे तलावात मुबलग पाणी साठा जमा झालेला आहे. सद्या नळाला दहा दिवसाला पाणी सोडण्यात येत आहे तो एक दिवस आड नळाला गरजेचे आहे.दहा दिवस आड पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जे नागरिकाचे पिण्यासाठी पाण्याचा साठा करीत आहे त्यामध्ये दुर्गंधी वास येऊन पाण्यामध्ये किटाणू तयार होऊन ते पाणी पिल्यानंतर आजारी पडत आहे. बाबत आपल्या कार्यालया अनेकवेळा निवेदन दिल्यानंतर मोटर खराब आहे. मोटार दुरुस्ती होताच नियमित पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन देण्यात येत आहे परंतु त्यांची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही.

  तसेच आर.के नगर सोमनाथपुर येथील वस्तीच्या बाजू आपल्या नगर परिषद मार्फत घाण कचरा टाकण्यात येत आहे त्यामध्ये मृत्यू जनावरे अनेक प्रकारचा घाण वस्तू असतात ते जाळत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून अनेक प्रकारचे लहान मुलांना व वयोवृद्ध नागरिकांना श्वास घेणे अवघड झाले आहे. या ठिकाणी घाणकचरा खत निर्माण करीत आहे. तो बेकायदेशीर असल्यामुळे ते त्वरित बंद करण्यात यावे. याबाबत आपल्याकडे अनेक वेळा अर्ज देऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेऊन येत्या आठ दिवसात कारवाई करण्यात यावी अन्यथा समाजवादी पार्टी उदगीर तर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल याची गारभिऀयाने नोंद घ्यावी ही नम्र विनंती. निवेदन देते वेळेस समाजवादी पार्टी पदाधिकारी उपस्थितीसमाजवादी पार्टी ता. अध्यक्ष जविद बागवान, शहर अध्यक्ष मेहबूब बागवान, ता. उपाध्यक्ष शेख जुनेद, शहर उपाध्यक्ष शेख इम्रान, जि. उपाध्यक्ष जमील शाह, परमेश्वर भाऊ ता. कार्याध्यक्ष, पठाण सैफ, अल्पसंख्याक ता. अध्यक्ष मोमीन सोहेल, गफूर कुरेशी, तल्हा कुरेशी, शेख इरफान, सय्यद हुसेन, सय्यद माजिद, इरफान भाई, बबलू शेख, नाजिम शेख, शेख तन्वीर, शेख फेरोझ सर , सोहेल बागवान, बबलू बागवान, सोहेल शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments