गाव तलावातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी नगराध्यक्षांचे रात्रभर जागरण


 

गाव तलावातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी नगराध्यक्षांचे रात्रभर जागरण

 औसा प्रतिनिधी

 औसा शहरासह तालुक्यात चार दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून सर्व जनतेची धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन व इतर खरीप पिकात पाणी शिरल्याने पिकांची नासाडी झाली. औसा शहरातील जमाल नगर या गाव तलावात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आती पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील गाव तलावाच्या पाण्याचा शहरवासीयांना धोका पोहोचू नये म्हणून नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी 27 सप्टेंबर रोजी जमाल नगर तलावाच्या परिस्थितीची पाहणी करीत अक्षरशा रात्रभर जागरण केले. तलावातील विसर्ग केलेले पाणी मोमिन गल्ली लेंडी गल्लीच्या नालीतून जात होते परिणामी काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नालीच्या जवळच्या रहिवाशांची दुरावस्था होत होती म्हणून दिनांक 27 सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी जमाल नगर तलावातील विसर्ग केलेले पाणी तसेच अॅप्रोच रोड वरून मोठ्या नालीतून येणारे पाणी कालन गल्लीतून जाणाऱ्या मोठ्या नाली कडे वळून नगरपरिषद शॉपिंग सेंटरच्या पाठीमागून खादी कार्यालयाकडून गावालगतच्या नाल्या कडे सुरक्षित रित्या वळवून शहरातील जनतेची होणारी गैरसोय टाळले आहे. नगराध्यक्ष अफसर शेख यांनी माजी उपनगराध्यक्ष दिगंबर माळी, कुरेशी समाजाचे अध्यक्ष नसिर कुरेशी,माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांना सोबत घेऊन व त्यांचे मार्गदर्शन घेऊन 28 संप्टेबर रोजी गाव तलावातील पाण्याला सुरक्षित मार्ग काढून दिल्याने नगराध्यक्षा चे औसेकर जनतेतून कौतुक केले जात आहे.



Post a Comment

0 Comments