*उत्का येथे पोषण आहार महाअभियान कार्यक्रम उत्साहात साजरा*
औसा:- तपसे चिंचोली
येथून जवळच असलेल्या उत्का ( ब) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प किल्लारी अंतर्गत 25 सप्टेंबर रोजी पोषण अभियानांतर्गत पोषण माह अभियान कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला महिला बहु उद्देशिय केंद्राच्या संचालिका अनिता गोरख कांबळे, बचतगटाच्या CRP कविता संभाजी ससाने ,आशा कार्यकर्ती निर्मला कोळी, किल्लारी प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी अनुपमा सुनापे ,उत्का (अ) (ब), उत्का तांडा येथील अंगणवाडी सेविका विश्रांती शिंदे ,उषा राठोड ,मिरा छत्रे ,संगीता राठोड ,अंगणवाडी मदतनीस शकुंतला चंदनशिवे, तसेच गावातील महिला व किशोरी मुली उपस्थित होत्या.
यावेळी किल्लारी प्रकल्पाच्या विस्तार अधिकारी सुनापे मॅडम यांनी आहार व आरोग्य यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर महिला बचत गटाच्या महिलांना घरी पोषण वाटीका करण्याकरिता बी बियाणे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सहकार्य केले.
0 Comments