आझाद महाविद्यालयास आयएसओ मानांकन


 

आझाद महाविद्यालयास आयएसओ मानांकन

 औसा_ येथील हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित आझाद महाविद्यालयास मानाचे ISO 9001/2015 हे मानांकन प्राप्त झाले असून महाविद्यालयीन व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या बाबतीत जे निकष ठरवून देण्यात आले होते ते पूर्ण केल्याने महाविद्यालयास मानाचे आयएसओ मानांकन प्राप्त झाले. मागच्या एक महिन्यापासून महाविद्यालयाची आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठीची आवश्यक ती तयारी चालू होती. याची दिल्लीस्थित QCL सर्टिफिकेशन प्रा. लिमिटेड या कंपनीने पाहणी करून दर्जा तपासून महाविद्यालयास ISO 9001/2015 चे प्रमाणपत्र बहाल केले,जे २४ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले. सदरील मानांकन हे पुढील ०३ वर्षासाठी असणार आहे.या मानांकनासाठी प्राचार्य डॉ.ई.यू मासूमदार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. मानांकनासाठी उपप्राचार्य टी.ए जहागीरदार, नॅकचे प्रा डॉ.एम.ए बरोटे, आयक्यूएसीचे प्रा डॉ.एन.के सय्यद, कार्यालय अधिक्षक शकील शेख,सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांनी तयारी केली. या मानांकन प्राप्तीबद्दल नगराध्यक्ष तथा संस्था सचिव डॉ. अफसर शेख तसेच सर्व सन्माननिय सदस्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments