करजगाव येथे पूरक पोषण आहार महाअभियान कार्यक्रम संपन्न


 

*करजगाव येथे पूरक पोषण आहार महाअभियान कार्यक्रम संपन्न*


*औसा प्रतिनिधी*


महाराष्ट्र व केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किल्लारी, तपसेचिंचोली विभागामार्फत करजगाव येथे पर्यवेक्षिका शशिकला भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 20 सप्टेंबर रोजी पूरक पोषण महाअभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला.

सप्टेंबर हा महिना पूरक पोषण महाअभियान म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .


पोषण अभियान हा महत्वकांक्षी योजनेचा भाग मानला जातो.

केवळ 0 ते 6 वयोगटातील बालकांचा विचार न करता संपूर्ण 18 वर्षाखालील बालके , किशोरवयीन मुली ,गरोदर महिला स्तनदा माता तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या व पोषण बदलाच्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल व्हावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या पोषण आहार अभियानातून आहाराचे महत्व , आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सकस आहार किती महत्त्वाचा आहे याबाबत सविस्तर माहिती किल्लारी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी किशोर गोरे सरांनी दिली.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील ,जिल्हा परिषद सदस्य भागवत कांबळे, महिला बाल कल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी ,करजगावच्या सरपंच सौ पल्लवी श्रीधर जाधव , जवळगा विभागाच्या पर्यवेक्षिका प्रभावती वाहुळे , तसेच करजगाव येथील महिला व किशोरी मुली उपस्थित होत्या .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करजगाव येथील अंगणवाडी सेविका आशा दळवे, माळी पद्मावती, जाधव सविता ,अंगणवाडी मदतनीस रेषा भोसले , तपसे चिंचोली विभागाच्या अंगणवाडी सेविका कालिंदाबाई वडगावे , संपताबाई नेटके ,छायाबाई कांबळे , शकुंतला चव्हाण यांनी सहकार्य केले .Post a Comment

0 Comments