प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अँड.मिरान(इम्रान)उजलूमवाले यांची औसा तालुका सल्लागार पदी निवड
औसा प्रतिनिधी
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात 26 संप्टेबर 2021 रवीवार रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहायक संतोष राजगुरू व जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या उपस्थितीत अँड मिरान (इम्रान) उजलूमवाले यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने औसा तालुका सल्लागार पदी निवड करण्यात आली.याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अँड हणमंत शिंदे, संजय भोज, बालाजी जाधव, बालाजी सूर्यवंशी, विश्वनाथ कुलकर्णी,मुरतुजा शेख, जावेद पठाण, अँड जहीर उजलूमवाले, आदींच्या उपस्थितीत त्यांना औसा तालुका सल्लागार पदी निवड करुन नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.त्याच्या या निवडीबद्दल मित्र परिवारातर्फे अभिनंदन केले जात आहे.
0 Comments