पंतप्रधानांचा वाढदिवस औशात विविध उपक्रमांनी साजरा


 

पंतप्रधानांचा वाढदिवस औशात विविध उपक्रमांनी साजरा 

औसा(प्रतिनिधी)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 17 सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिम नगर येथील सांस्कृतिक सभागृह मध्ये उज्वला गॅस योजना,अन्नपूर्ण योजना, अंत्योदय योजना, व इतर शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचा आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते सत्कार करून नागरिकांना शासकीय योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी भीम नगर,बौध्द नगर, महात्मा फुले नगर, संजय नगर, व परिसरातील 272 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसही देण्यात आली. यामध्ये 200 महिलांनी सहभाग घेतला.तसेच भारतीय जनता पार्टी औसा तालुका शाखेच्यावतीने येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आमदार अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत फळे वाटप करण्यात आली.


Post a Comment

0 Comments