औशात भाजपाचे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन !


 

औशात भाजपाचे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन !


औसा (प्रतिनिधी) राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने आज राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे यात औसा तहसील कार्यलय समोर आंदोलन करण्यात आले आहे औसा येथे भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांचा नेतृत्वाखाली औसा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडू न शकल्याने ओबीसीच राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमला पण त्यास अद्यापही निधी उपलब्ध करून दिली नसल्याने डेटा जमा करता आला नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने गेल्या सहा महिन्यापासून टाळाटाळी करत असल्याने ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे जोपर्यंत ओबीसीना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी आंदोलक आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. या आंदोलनात सुशील कुमार बाजपाई, ॲड.अरविंद कुलकर्णी, 

तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,युवा नेते संतोष मुक्‍ता,जिल्हा उपाध्यक्ष काका साहेब मोरे, तालुका चिटणीस गजेंद्र डोलारे,

महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे, ॲड.मोहिनी पाठक, सुनिता सूर्यवंशी, सागर आपुने, बाळासाहेब पाटील,नवनाथ मुसके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments