भुसारवेस ते जुना बोरफळ रस्ता दुरुस्त करा:भागवत माळी


 

भुसारवेस ते जुना बोरफळ रस्ता दुरुस्त करा:भागवत माळी

औसा प्रतिनिधी

औसा नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 मधील भुसारवेस ते जुना बोरफळ रोडपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाल्याने तरी सदरील रस्त्यावर तुर्त मुरुम टाकून दबाई करावी आणि हा रस्ता कायमस्वरूपी पक्का करावा अशी मागणी काॅग्रेस ओबीसी सेलचे शहाराध्यक्ष भागवत माळी व ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नियामत लोहारे यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना आज दि.14 सप्टेंबर 2021 मंगळवार रोजी निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात औसा नगरपरिषद हद्दीतील भुसार वेशी पासून श्रीराम मंदिर जुना बोरफळ रस्त्याला जाणा-या रोडपर्यंत शहराच्या बाजुने मागील अनेक दिवसांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत.ठिकठिकाणी पाणी साचुन चिखल झाला आहे.या परिसरातील नागरिक, शेतकरी यांना बैल बारदाना जनावरे,वाहने घेऊन जाणे कठीण झाले आहे.तरी सदरील रस्त्यावर तुर्त मुरुम टाकून दबाई करावी आणि हा रस्ता कायमस्वरूपी पक्का करून प्रभाग क्रमांक 8 मधील जनतेची गैरसोय दूर करावी.या मागणीचे निवेदन औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहेत.यावेळी या निवेदनावर कॉंग्रेस ओबीसी सेलचे औसा शहराध्यक्ष भागवत पांडुरंग म्हेत्रे,व ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नियामत लोहारे यांची स्वाक्षरी आहे.
Post a Comment

0 Comments