लातूर जिल्हयाचे सुपुत्र तथा मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. शिवकुमारजी डिगे यांचा सत्कार


 

लातूर जिल्हयाचे सुपुत्र तथा मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. शिवकुमारजी डिगे यांचा सत्कार 


औसा: लातूर जिल्हयाचे सुपुत्र तथा मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. शिवकुमारजी डिगे साहेब यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून आपले शिक्षण घेवून वकीलीची सनद मिळविली, परंतु त्यांना वकीली ऐवजी वकीलीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यानाच शिकविण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी लातूर येथे आपले वकीलीचे शिक्षणाचे क्लास सुरु करुन लातूर जिल्हयातील अनेक विद्यार्थ्यांना वकील बनविण्यात मोलाची भुमीका बजावली व लातुर जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसायास प्रारंभ करुन अल्पावधीच आपल्या संघटन चातुर्याच्या जोरावर लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी सरळ जिल्हा न्यायाधिश पदाची परीक्षा दिल्याने पहिल्याच प्रयत्नात जिल्हा न्यायाधिश पदी निवड झाली, आपल्या कामाचा ठसा उमटवत असतांनाच शासनाने त्यांच्याकडे धर्मादाय आयुक्तपदाची जिम्मेदारी दिली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रबंधक पदी काम करण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचा प्रत्येक ठिकाणी त्यांनी सोन करुन आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीने काम करण्याची शपथ महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम भगतसिंगजी कोश्यारी यांनी दिली.मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीपदी त्यांची निवड झाल्यानंतर न्यायमुर्ती माननिय शिवकुमारजी डिगे साहेब हे पहिल्यांदाच लातुर येथे आले असता त्यांचा लातुरचे शासकीय विश्रामगृह येथे दिनांक १२/०९/२०२१ रोजी औसा वकील मंडळाच्या वतीने अध्यक्ष अॅड. श्रीधर जाधव यांनी आपल्या शिष्टमंडळासह भेट घेवून त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व औसा वकील मंडळाच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी अॅड. मुजीब शेख, अॅड. संतोष माडजे, अॅड. गजेंद्र गिरी, अँड. एफ.एस. पटेल, अॅड. एम. पी. शेख उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments