नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयांची आर्थिक मदत तात्काळ वाटप करा: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
औसा प्रतिनिधी
औसा- गेल्या काही दिवसात औसा तालुक्यातसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या नगदी पिकाचे 100% नुकसान झालेले आहे तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेलेल्या असून पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,शासकीय आकडेवारीनुसार राज्यात बारा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून चार ते पाच हजार पशुधन वाहून गेले आहे, तसेच चारशे ते साडेचारशे व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झालेला आहे अशा परिस्थितीत शासनाने झालेल्या नुकसानीची पाहणी, पंचनामे व फोटोसेशन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपयांची नगदी स्वरूपात आर्थिक मदत तात्काळ वाटप करावी. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना मदतीची घोषणा नाही केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसा च्या वतीने रत्नागिरी-नागपुर हायवे औसा येथे अडवून सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.तहसीलदार औसा यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना देण्यात आला आहे,यावेळी मनसेचे औसा तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे, महेश बनसोडे, धनराज गिरी,राजेंद्र कांबळे,मुकेश देशमाने,अमोल थोरात,जिवन जंगाले, तानाजी गरड, अमोल परिहार, विकास भोजने, दाजी देवसिंगकर,समीर खान,प्रशांत बिडवे,निवास मुळे,शिवराज चव्हाण, दिगंबर कांबळे,राजेंद्र कदम,नारायण गरड,महादेव चव्हाण,रियाज आलमले इ..कार्यकर्ते, पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
0 Comments