स.नं.4 चे कबालनामे तातडीने द्या धरणे व निदर्शने अंदोलन संपन्न


 

स.नं.4 चे कबालनामे तातडीने द्या धरणे व निदर्शने अंदोलन संपन्न..!!


अहमदपूर दि

अहमदपूर शहरातील स.नं.4 या शासकीय गायरानावरील अतिक्रमण कायम करून तातडीने कबालनामे देवून प्रधानमंत्री आवास योजनेचे फाॅर्म भरून घ्यावे या मागणीसाठी येथील नागरिकांच्या वतीने युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे निदर्शने अंदोलन करण्यात आले.


येथील स.नं.4 ही शासकीय जागा असून यावर गेल्या पन्नास वर्षापासून अतिक्रमण करण्यात आले आहे.या झोपडपट्टी धारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अंतर्गत घरकूल मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे.संचालक नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या वतीने अतिक्रमण नियमानूकूल करण्यास मंजूरी प्रदान केली आहे. मात्र प्रशासकीय स्तरावर हा विषय प्रलंबीत आहे. प्रशासनाने स.नं.वरील एकूण 267 पैकी 240 च्या आसपास सर्व लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानूकूल करण्याची प्रक्रीया सूरूवात करावी त्यांच्या कडून अतिक्रमीत केलेल्या क्षेत्राचे तातडीने दंड वसूल करून पैसे भरून घेवून कबालनामे वितरीत करावे आणी नगर पालिकेने कॅम्प लावून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूलांचे फार्म भरून त्याच्या मंजूरीची प्रक्रिया तातडीने राबवावी आदी मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रविण फूलारी यांच्याकडे देण्यात आले. 

प्रास्ताविक शेख सत्तारभाई यांनी केले.तर नगरसेवक डाॅ.फूजैल जहागीरदार,शेख जब्बार,सामाजिक कार्यकर्ते जीवनराव गायकवाड,शेख रहीमभाई,सय्यद आजीमभाई,जिलानी मणियार आदींचे भाषणे झाली.या वेळी नगरसेवक भैय्याभाई भजेवाले,

अण्णाराव सूर्यवंशी, प्रशांत जब्बारखान पठाण,जाभाडे,आकाश सांगवीकर,अजय भालेराव,कैलास भालेराव,नौशाद सय्यद,शेख अय्याजभाई,जब्बार पठाण,नूर मोहम्मद,गणीभाई पत्रे,सय्यद हाशम,शेख दस्तगीर,सय्यद हमीद,जगदीश वाघमारे,मतीन शेख,नंदादीप वाघमारे,अनिताताई कांबळे,गवळणबाई हानमंते,राजू गूळवे,सूनिल ससाणे,हाजी शेख, सय्यद एजाजभाई, फारूखभाई मणीयार,आनंद कांबळे,शरद बनसोडे,रवी बनसोडे,सचिन बानाटे आदी सह नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments