औसा पंचायत समितीच्या मा.उपसभापती,विद्यमान पं.स. सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे यांच्या 15 व्या वित्त आयोग पं.स.स्तराच्या फंडातून मतदार संघातील मौजे शिवली येथे विविध विकास कामांचा उदघाटन शुभारंभ


 

औसा पंचायत समितीच्या मा.उपसभापती,विद्यमान पं.स. सदस्या सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे यांच्या 15 व्या वित्त आयोग पं.स.स्तराच्या फंडातून मतदार संघातील मौजे शिवली येथे विविध विकास कामांचा उदघाटन शुभारंभ..

            15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर माझ्या फंडातून तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत मतदारसंघात मौजे शिवली येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या हनुमान मंदिर ते महादेव मंदिर पेवर ब्लॉक रस्ता,महादेव मंदिर ते औसा उस्मानाबाद रस्ता पेवर ब्लॉक, सहदेव पाटील यांचे घरापासून अंगणवाडी क्रमांक चार पर्यंत बंदिस्त सिमेंट नाली बांधकाम,आणि वडार वस्ती मधील सिमेंट रस्ता बांधकाम इत्यादी विविध योजनेतून करण्यात येणाऱ्या विकास कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक 11-9-2021 रोजी करण्यात आला,


याप्रसंगी औसा पंचायत समितीच्या मा. उपसभापती तथा विद्यमान सदस्या सौ, रेखाताई शिवकुमार नागराळे, सरपंच सुधाकर खडके,मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे,मा.सरपंच महादेवी वाले,ग्रामपंचायत सदस्य अकबर तांबोळी, दीपक पावले,यांच्यासह,विश्वनाथ बनसोडे,मनमथ उत्केकर,नामदेव जाधव देवराव आण्णा नटवे, आत्माराम यादव शरणाप्पा कुरले, पांडुरंग कुरले भिष्मा क्षिरसागर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments